top of page

लक्ष्मी पोटली

₹1,299.00 Regular Price
₹999.00Sale Price
Quantity

घरात सुख-समृद्धी नांदावी, व्यवसायात-करिअरमध्ये प्रगती व्हावी आणि आर्थिक स्थैर्य लाभावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. याच शुभ संकल्पनेतून सादर आहे लक्ष्मी पोटली, जी संपन्नता, सौभाग्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या विशेष वस्तूंचा एक आध्यात्मिक संग्रह आहे. या पवित्र पोटलीमध्ये अशा विविध वस्तू (लक्ष्मी पादुका, गोमती चक्र, कवडी, पायराइट, कुबेर चावी इत्यादी) आहेत, ज्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी, जीवनात स्थिरता आणण्यासाठी ओळखल्या जातात. या वस्तूंचे एकत्रित स्वरूप देवी लक्ष्मीच्या कृपेची आणि भरभराटीच्या संकल्पनेची आठवण करून देते. ही पोटली तुम्ही देवघरात, तिजोरीत किंवा ऑफिसमधील सुरक्षित जागी ठेवू शकता. अनेकजण श्रद्धेनुसार ती आपल्या कॅश बॉक्समध्ये ठेवतात, जेणेकरून धनसंपत्तीचा आदर, बचतीची जाणीव आणि समृद्धीचा संकल्प कायम राहील. सणासुदीच्या काळात, विशेषतः दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या निमित्ताने, गृहप्रवेश यांसारख्या शुभप्रसंगी भेट देण्यासाठी ही एक उत्तम निवड आहे.


फायदे

  • यशाच्या मार्गातील अडथळे दूर करते

  • व्यवसायात, करिअरमध्ये प्रगतीला चालना देते

  • वास्तूतील दोष दूर करून धनलक्ष्मीला आकर्षित करते

  • नवीन संधी समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य आकर्षित करते

  • आजूबाजूला सकारात्मक आणि शुभ ऊर्जेचा संचार करते

  • सौभाग्य घेऊन येते आणि नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण करते


काळजी कशी घ्यावी?

  • थेट पाण्याच्या संपर्कात येऊ देवू नका

  • स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा

  • साबण, परफ्युम, केमिकल्स यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best Sellers

    Terms & Conditions

    bottom of page