Citrine Locket
अर्थ :
सिट्रीन लॉकेट म्हणजे समृद्धी, यश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक. सिट्रीन आत्मविश्वास वाढवतो, नकारात्मक विचार दूर करतो आणि आयुष्यात प्रगती व संधी आकर्षित करण्यास मदत करतो. हा आनंद, उत्साह आणि स्पष्ट विचारशक्ती वाढवणारा मानला जातो, त्यामुळे पैसा, करिअर आणि वैयक्तिक वाढीसाठी सिट्रीन लॉकेट परिधान केले जाते. आध्यात्मिकदृष्ट्या, सिट्रीन इच्छाशक्ती मजबूत करतो, भीती व आत्मशंका कमी करतो आणि manifestation साठी उपयुक्त मानला जातो. त्यामुळे अनेक जण व्यवसाय, नवीन कामाची सुरुवात किंवा आर्थिक स्थैर्यासाठी सिट्रीन लॉकेट वापरतात.
फायदे :
आर्थिक समृद्धी व यश आकर्षित करतो
आत्मविश्वास व इच्छाशक्ती वाढवतो
निर्णयक्षमता व leadership qualities वाढतात
निराशा, उदासीनता दूर करून उत्साह वाढतो
ध्येय स्पष्ट करून त्याकडे कृती करण्याची ताकद देतो
मानसिक स्पष्टता व फोकस वाढवतो
भावनिक स्थैर्य राखण्यास सहाय्यक
सिट्रीन लॉकेट वापरायचे कसे?
सिट्रीन लॉकेट गळ्यात, हृदयाच्या जवळ येईल अशा चेनमध्ये घालावे. विशेषतः गुरुवारी सकाळी, स्नान करून स्वच्छ कपडे घातल्यानंतर घालणे शुभ मानले जाते. घालण्यापूर्वी स्वच्छ पाणी किंवा गंगाजलाने हलकेच धुवून कोरडे करावे. लॉकेट हातात धरून ९ किंवा ११ वेळा “ॐ बृहस्पतये नमः” किंवा “ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः” जप करावा. नोकरी, व्यवसाय, अभ्यास किंवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज घालू शकता.
सिट्रीन लॉकेटची काळजी कशी घ्यावी?
अंघोळ, पोहणे किंवा हात धुण्याआधी काढून ठेवा. थेट सूर्यप्रकाशात जास्त वेळ ठेवू नका, कारण त्यामुळे रंग फिकट होऊ शकतो. स्वच्छतेसाठी मऊ कोरड्या कापडाने हलके पुसा. लॉकेट खाली पडू देऊ नका. कारण स्फटिकाला तडे जाण्याची शक्यता असते. इतर दागिन्यांसोबत न ठेवता वेगळ्या मऊ पिशवीत किंवा बॉक्समध्ये ठेवा, परफ्युम, हेअरस्प्रे, क्रीम लावल्यावरच लॉकेट घाला, म्हणजे रसायनांचा संपर्क येणार नाही. महिन्यातून एकदा धूप, अगरबत्ती किंवा मंत्रजपाने ऊर्जा शुद्धीकरण करा. झोपताना किंवा जड काम करताना लॉकेट काढून ठेवणे अधिक सुरक्षित आहे.

