top of page
Search

तुमच्या राशीनुसार रुद्राक्ष धारण करा, महादेवांचे शुभाशिर्वाद मिळवा; नियमही पाळा

अध्यात्म शास्त्रात रुद्राक्षाला अत्यंत महत्त्व आहे. अनेक जण श्रद्धेने रुद्राक्ष धारण करतात, परंतु तो केवळ फॅशन म्हणून न घालता शास्त्रशुद्ध पद्धतीने परिधान केल्यास त्याचे अधिक सकारात्मक परिणाम मिळतात. विशेषतः आपल्या राशीच्या स्वामी ग्रहाचा विचार करून रुद्राक्ष निवडल्यास, कुंडलीतील दोष दूर होऊन भाग्योदय होऊ शकतो, असे मानले जाते. चला जाणून घेऊया, बारा राशींसाठी कोणते मुखी रुद्राक्ष फलदायी ठरतात:


१. मेष आणि वृश्चिक (स्वामी: मंगळ)या दोन्ही राशींचा स्वामी मंगळ आहे. त्यांनी 'तीन मुखी' रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. यामुळे जीवनात ऊर्जा टिकून राहते, आत्मविश्वासात वाढ होते आणि महादेवांच्या कृपेने आर्थिक विवंचना दूर होऊ शकतात.


२. वृषभ आणि तूळ (स्वामी: शुक्र)ज्यांचा राशीस्वामी शुक्र आहे, त्यांच्यासाठी 'सहा मुखी' रुद्राक्ष सर्वोत्तम आहे. यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात, शुक्र ग्रहाची स्थिती मजबूत होते आणि रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते.


३. मिथुन आणि कन्या (स्वामी: बुध)बुध हा बुद्धीचा कारक आहे. मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी 'चार मुखी' रुद्राक्ष परिधान करावा. यामुळे शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होते आणि निर्णयक्षमता सुधारते.


४. कर्क (स्वामी: चंद्र)कर्क राशीच्या व्यक्तींनी 'दोन मुखी' रुद्राक्ष धारण करावा. यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि कुंडलीतील चंद्र ग्रहाची स्थिती बलवान होऊन मानसिक शांती लाभते.


५. सिंह (स्वामी: सूर्य)सिंह राशीचा स्वामी साक्षात सूर्यदेव आहेत. त्यांनी 'बारा मुखी' रुद्राक्ष धारण करणे हिताचे आहे. यामुळे समाजात मान-सन्मान वाढतो आणि आव्हानांशी लढण्याचे बळ प्राप्त होते.


६. धनु आणि मीन (स्वामी: गुरु)बृहस्पती किंवा गुरु ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी 'पाच मुखी' रुद्राक्ष धारण करावा. यामुळे ज्ञानाची वृद्धी होते, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात.


७. मकर आणि कुंभ (स्वामी: शनि)शनि देवाची कृपा संपादन करण्यासाठी मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी 'सात मुखी' रुद्राक्ष परिधान करावा. महादेव हे शनिदेवाचे आराध्य दैवत असल्याने, हा रुद्राक्ष धारण केल्याने साडेसाती किंवा शनिदोषाची तीव्रता कमी होते आणि कामातील अडथळे दूर होतात. टीप: सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त आहे. म्हणूनच आजच आमच्या अनुभवी ज्योतिषांचा सल्ला घ्या आणि अस्सल व प्रमाणित रुद्राक्ष खरेदी करण्यासाठी आमच्या https://www.lokmatbhakti.com/ या संकेतस्थळाला नक्की भेट द्या

 
 
 

Comments


bottom of page