रुद्राक्ष धारण केलाय? शुभफल प्राप्तीसाठी ‘या’ मंत्रांचा जप करा; कोणते नियम पाळावेत?
- Kalpesh Thakare
- Mar 30
- 2 min read
अध्यात्म आणि भारतीय संस्कृतीमध्ये रुद्राक्षाला अत्यंत पवित्र स्थान आहे. 'रुद्र' म्हणजे भगवान शिव आणि 'अक्ष' म्हणजे अश्रू; म्हणजेच शंकराच्या नयनांतून पडलेल्या अश्रूंपासून रुद्राक्षाची निर्मिती झाली, अशी याची व्युत्पत्ती सांगितली जाते. अनेकदा आपण साधू-संत किंवा पंडितांच्या गळ्यात रुद्राक्ष पाहतो, परंतु हा कोणताही दागिन्याचा प्रकार नसून त्यामागे एक सखोल आध्यात्मिक शास्त्र दडलेले आहे.
रुद्राक्षाचे पावित्र्य आणि विधीरुद्राक्ष हा सर्वकल्याणकारी, मंगलदायी आणि आयुष्य वाढवणारा मानला जातो. मात्र, त्याचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी तो केवळ परिधान करून चालत नाही. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी तो अभिमंत्रित करणे अनिवार्य आहे. योग्य मंत्रोच्चाराशिवाय रुद्राक्ष धारण केल्यास त्याचा अपेक्षित सकारात्मक परिणाम दिसून येत नाही.
शक्य असल्यास एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून किंवा गुरुंकडून रुद्राक्ष अभिमंत्रित करून घ्यावा. जर तसे शक्य नसेल, तर विशिष्ट मंत्रांचा जप करून तुम्ही स्वतः देखील रुद्राक्षाचे आवाहन करू शकता.
तर एकमुखी रुद्राक्षाचे देवता महादेव असून त्यांना प्रसन्न करण्यासाठी ॐ ह्नीं नमः मंत्राचा जप करावा, द्विमुखी रुद्राक्षाचे देवता अर्धनारीश्वर असून त्यांच्या प्रसन्नतेसाठी ॐ नमः हा मंत्र म्हणावा, त्रिमुखी रुद्राक्षाचे देवता भगवान शिव आणि अग्नी असून त्यांना प्रसन्न करण्यासाठी ॐ क्लीं नमः मंत्राचा जप करावा,चतुर्मुखी रुद्राक्षाचे देवता महादेव आणि ब्रह्मा असून त्यांच्या प्रसन्नतेसाठी ॐ ह्नीं नमः मंत्राचा जप करावा, पंचमुखी रुद्राक्षाचे देवता कालाग्नि रुद्र यांच्या प्रसन्नतेसाठी ॐ ह्नीं नमः मंत्र म्हणावा, षण्मुखी रुद्राक्षाचे देवता भगवान शिव आणि कार्तिकेय असून त्यांना प्रसन्न करण्यासाठी ॐ हृीं हुँ नमः मंत्राचा जप करावा,सप्तमुखी रुद्राक्षाचे देवता सप्तमातृका आणि सप्तर्षी असून त्यांना प्रसन्न करण्यासाठी ॐ हुँ नमः मंत्राचा जप करावा, अष्टमुखी रुद्राक्षाचे देवता भगवान शिव आणि बटुक भैरव असून त्यांच्या प्रसन्नतेसाठी ॐ हुँ नमः मंत्र म्हणावा, नवमुखी रुद्राक्षाचे देवता भगवान शिव आणि देवी दुर्गा असून त्यांना प्रसन्न करण्यासाठी ॐ ह्नीं हुँ नमः मंत्र म्हणावा, दशमुखी रुद्राक्षाचे देवता विष्णू स्वरूप असून त्यांना प्रसन्न करण्यासाठी ॐ ह्नीं हुँ नमः मंत्राचा जप करावा.
रुद्राक्षाची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यातून सातत्याने लाभ मिळवण्यासाठी, एकदा अभिमंत्रित केलेला रुद्राक्ष वर्षभरानंतर पुन्हा एकदा विधीवत अभिमंत्रित करावा, असे शास्त्र सांगते. यामुळे त्यातील चैतन्य कायम राहते. तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी कोणता रुद्राक्ष योग्य आहे? हे जाणून घेण्यासाठी आजच https://www.lokmatbhakti.com/ ला भेट द्या.




Comments