top of page
Search

रुद्राक्ष माळा कोणी घालावी आणि कोणी घालू नये? ज्योतिषशास्त्र काय सांगते?

रुद्राक्ष ही भारत, नेपाळ, इंडोनेशिया आणि हिमालयाच्या पट्ट्यात आढळणारी एक अत्यंत महत्त्वाची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या फळांपासून तयार होणाऱ्या मण्यांचा वापर जपमाळ किंवा अलंकार म्हणून केला जातो. रुद्राक्षाचे एकमुखीपासून ते चतुर्दशमुखीपर्यंत अनेक प्रकार उपलब्ध आहेत. परंतु, ज्याप्रमाणे प्रत्येक जडीबुटी प्रत्येकासाठी गुणकारी ठरतेच असे नाही, तसेच रुद्राक्षाचेही आहे. ज्योतिषशास्त्र आणि शरीरशास्त्राचे नियम समजून घेऊनच रुद्राक्ष धारण करणे हिताचे असते.


आपल्या पूर्वजांनी दागिन्यांची रचना केवळ सौंदर्यासाठी केलेली नाही. गळ्यात किंवा हातात घातल्या जाणाऱ्या अलंकारांचा थेट प्रभाव आपल्या मेंदूवर आणि रक्तदाबावर (Blood Pressure) पडत असतो. पण ज्यांना रुद्राक्षाची आवश्यकता नाही किंवा वापरण्याची गरज नाही, अशा व्यक्तींनी केवळ फॅशन म्हणून रुद्राक्ष धारण केल्यास त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. यामुळे रक्तदाब कमी होणे किंवा विनाकारण अस्वस्थता वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. अनेकदा वापरणाऱ्या व्यक्तीला ही अस्वस्थता रुद्राक्षामुळे आहे, हे लक्षातही येत नाही. म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय रुद्राक्ष वापरणे टाळावे.


आपल्या संस्कृतीतील अनेक प्रथांमागे विज्ञानाची जोड आहे. मनगट आणि हाताच्या बोटांचा संबंध थेट हृदयाशी असतो. साखरपुड्यात अनामिकेत (Ring Finger) अंगठी घालणे किंवा बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधणे, यामागे ऋणानुबंध आणि प्रेम घट्ट जोडले जावे, हा उद्देश असतो. या प्रथा विचारपूर्वक निर्माण केल्या गेल्या आहेत. त्यांचे शास्त्र न समजता केवळ 'गंमत' म्हणून केलेले प्रयोग आयुष्यात गुंतागुंत निर्माण करू शकतात. 


रुद्राक्ष हे अत्यंत पवित्र आणि विरक्तीचे (Detachment) प्रतीक मानले जाते. त्यामुळे ते धारण करताना काही नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. जसे की मांसाहार आणि मद्यपान करणाऱ्या व्यक्तींनी रुद्राक्षाला स्पर्श करणे किंवा तो धारण करणे टाळावे. रुद्राक्ष हा प्रामुख्याने आध्यात्मिक प्रगतीसाठी असतो. ज्यांना पूर्णपणे भौतिक आणि संसारसुखाची अपेक्षा आहे, त्यांनी तो गळ्यात धारण करू नये. संसारी व्यक्ती रुद्राक्षाच्या माळेने जप करू शकतात, परंतु ती गळ्यात घालू नये. ज्यांना आध्यात्मिक मार्गात उन्नती साधायची आहे, त्यांनीच ज्योतिषांच्या मार्गदर्शनाखाली रुद्राक्ष परिधान करावा.


तुम्हीही रुद्राक्ष माळा घालण्याचा विचार करताय? पण अस्सल रुद्राक्ष माळा कुठे मिळेल याचा प्रश्न पडलाय? मग आजच आमच्या वेबसाईटवरून विकत घ्या https://www.lokmatbhakti.com/product-page/rudraksha-mala-certified


 
 
 

Comments


bottom of page