top of page
Search

लग्न जुळवताना मंगळ दोष पाहून स्थळ नाकारताय? थांबा, आधी ही माहिती वाचा!

आजच्या आधुनिक युगात माणूस मंगळ ग्रहावर वस्ती करण्याच्या गप्पा मारत आहे, पण दुसरीकडे "मुलीला कडक मंगळ आहे, लग्न जमणार नाही" किंवा "मुलाच्या पत्रिकेत दोष आहे" अशा कारणांमुळे अनेक विवाह रखडलेले दिसतात. हे चित्र अत्यंत परस्परविरोधी वाटते. मंगळाबाबत समाजात पसरलेल्या भीतीमागे नेमकी मेख कुठे आहे, हे समजून घेणे काळाची गरज आहे.

दोष नव्हे, तो तर एक 'योग' ज्योतिषशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे तर, पत्रिकेतील मंगळ हा 'दोष' नसून तो एक 'योग' आहे. जसे कुंडलीत इतर ग्रह (रवि, चंद्र, बुध) विशिष्ट स्थानी असतात, तसाच मंगळही असतो. त्याच्या विशिष्ट स्थितीमुळे त्याला 'मंगळ योग' म्हटले जाते. दुर्दैवाने, 'दोष' या शब्दामुळे त्याभोवती एक नकारात्मक वलय निर्माण झाले आणि विवाहेच्छुक मंडळी धास्तावली.

पूर्वीच्या काळी जेव्हा प्रत्यक्ष भेटीगाठी किंवा फोटो पाहण्याची सोय नव्हती, तेव्हा पत्रिकाच व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज देण्याचे साधन होती. मंगळ हा ग्रह ऊर्जेचे प्रतीक आहे. ज्यांच्या पत्रिकेत प्रभावी मंगळ असतो, अशा व्यक्ती प्रामुख्याने मेहनती, जिद्दी, स्वाभिमानी आणि थोड्या शीघ्रकोपी (पटकन राग येणाऱ्या) असतात. जर पती-पत्नी दोघेही प्रचंड रागीट किंवा हट्टी असतील, तर संसारात वादाची ठिणगी पडू शकते. म्हणून, एकाचा स्वभाव तीव्र असेल तर दुसऱ्याचा सौम्य असावा, या दूरदृष्टीने पत्रिका मिळवल्या जात असत. मात्र, ही प्रक्रिया कठीण असल्याने लोकांनी सोयीस्करपणे त्याला 'मंगळ दोष' म्हणायला सुरुवात केली.

मनोमिलन की गुणमिलन? आजच्या काळात प्रेमविवाहाला मोठी पसंती दिली जाते. अशा वेळी अनेक अनुभवी ज्योतिषी सांगतात की, "जर तुम्ही एकमेकांना गुण-दोषांसह स्वीकारले असेल, तर पत्रिका पाहण्याची गरज उरत नाही." दोन व्यक्तींमधील प्रेम, आत्मीयता आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती कोणत्याही ग्रहाच्या स्थितीवर मात करू शकते. तसेच तुम्ही पत्रिका पाहूनच लग्न करणार असाल, तर मंगळाला घाबरण्याऐवजी त्याला अनुकूल अशी ग्रहस्थिती असलेली पत्रिका शोधा. एकमेकांच्या स्वभावाचा आदर करण्याची तयारी असेल, तर हाच मंगळ ग्रह तुमच्या संसारासाठी 'मंगल' ठरायला वेळ लागणार नाही. तुम्हीही पत्रिकेत मंगळ पाहून स्थळ नाकारत असाल तर त्यापूर्वी आमच्या अनुभवी ज्योतिषांकडून तुमची कुंडली आणि ग्रह नक्की जुळवून घ्या https://www.lokmatbhakti.com/matchmaking-report-form

 
 
 

Comments


bottom of page