7 चक्र ब्रेसलेट
मन अस्वस्थ, थकवा, सतत बदलणारी मनःस्थिती आणि सगळं काही असूनही आतून कुठेतरी अडकल्यासारखं वाटतंय? याच भावनेतून तयार करण्यात आलं आहे ७ चक्र ब्रेसलेट. हे स्फटिक सकारात्मक ऊर्जा, भावनिक संतुलन आणि अंतर्मनातील स्थैर्याशी जोडले जातात. आपल्या शरीरातील सात ऊर्जा केंद्रांशी संबंधित मानल्या जाणाऱ्या सात खास स्फटिकांचा सुंदर संगम म्हणजे हे ब्रेसलेट. मूलाधारपासून सहस्रार चक्रापर्यंत प्रत्येक चक्रासाठी एक खास क्रिस्टल.
रेड जॅस्पर (मूलाधार चक्र) - स्थैर्य आणि भावनिक संतुलनाशी जोडला जातो.
कार्नेलियन (स्वाधिष्ठान चक्र) - सर्जनशीलता, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा यांच्याशी संबंधित मानला जातो.
सिट्रिन (मणिपूर चक्र) - आत्मविश्वास, प्रेरणा आणि सकारात्मकतेशी जोडला जातो.
ग्रीन ॲव्हेंचरिन (अनाहत चक्र) - प्रेम, सुसंवाद आणि भावनिक शांततेचे प्रतीक मानले जाते.
टर्कॉइज (विशुद्ध चक्र) - स्वतःच्या भावना आणि विचार मोकळेपणाने व्यक्त करण्याशी संबंधित मानला जातो.
लॅपिस लाझुली (आज्ञा चक्र) - अंतर्मुखता, एकाग्रता आणि अंतर्ज्ञानाशी जोडला जातो.
ॲमेथिस्ट (सहस्रार चक्र) - शांतता, ध्यान आणि आध्यात्मिक चिंतनाचे प्रतीक मानले जाते.
हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.
ब्रेसलेटचे फायदे
स्थिरता, संरक्षण आणि भक्कम आधार प्रदान करते
भावनिक समतोल, प्रेम आणि करुणेला चालना देते
आत्मविश्वास, प्रेरणा आणि इच्छापूर्तीची क्षमता वाढवते
अंतर्ज्ञान, मानसिक स्पष्टता आणि सखोल समज वाढवते
संवाद, स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता आणि स्पष्टता सुधारते
सर्जनशीलता, भावनिक कणखरपणा आणि प्रेरणा यांना ऊर्जा देते
ब्रेसलेट कसे घालावे?
सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या
शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे
या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवा. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात
सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे ब्रेसलेट डाव्या हातात धारण करा
धारण करण्यापूर्वी शांतता, स्थिरता आणि सकारात्मकता यांसारखा एखादा संकल्प करा
ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?
ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा
ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका
आठवड्यातून एकदा ब्रेसलेट 'रॉ सेलेनाइट प्लेट'वर ठेवा किंवा कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा
कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो
साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा
आंघोळ करताना किंवा झोपताना हे ब्रेसलेट घालणे टाळा
७ चक्र ब्रेसलेटसोबत तुमच्या ऊर्जेला संतुलनाची नवी सुरुवात द्या!
(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

