कुंभ रास - ॲमेथिस्ट आणि लॅपिस लाझुली ब्रेसलेट
अर्थ
कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि असून या राशीचे लोक स्वतंत्र विचारांचे, कल्पक आणि भविष्याचा वेध घेणारे असतात. मात्र सतत विचार करत राहणे, भावनांना मनातच ठेवणे किंवा मानसिक ताण जाणवणे यामुळे कधी कधी मनाची शांतता आणि विचारांची स्पष्टता कमी होऊ शकते. म्हणूनच कुंभ राशीसाठी ॲमेथिस्ट आणि लॅपिस लाझुली क्रिस्टल्सपासून तयार केलेले हे ब्रेसलेट शांतता, स्पष्टता आणि भावनिक संतुलनाला आधार देते. ॲमेथिस्ट हे मनातील गोंधळ आणि तणावाची भावना कमी करून शांत, स्थिर मन राखण्यास मदत करणारा क्रिस्टल म्हणून याकडे पाहिले जाते. तर लॅपिस लाझुली स्वतःच्या भावना आणि विचार अधिक स्पष्टपणे व्यक्त करण्यास तसेच भावनिक स्पष्टता वाढवण्यास मदत करणारा क्रिस्टल मानला जातो.
हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.
ब्रेसलेटचे फायदे
भावनिक स्पष्टता सुधारते
मनातील गोंधळ शांत करते
आंतरिक शांतीला प्रोत्साहन देते
मन आणि भावनांमध्ये संतुलन साधते
आत्मविश्वासाने व्यक्त होण्यास मदत करते
ब्रेसलेट कसे घालावे?
सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या
शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे
या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवा. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात
सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे ब्रेसलेट डाव्या हातात धारण करा
धारण करण्यापूर्वी शांतता, स्थिरता आणि भावनिक समतोल यांसारखा एखादा संकल्प करा
ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?
ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा
ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका
कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा
कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो
साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा
रोजच्या आयुष्यात सकारात्मकतेची आणि शांततेची भावना जपण्यासाठी कुंभ राशीच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं क्रिस्टल ब्रेसलेट
(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

