मेष रास - रेड जॅस्पर आणि टायगर आय ब्रेसलेट
अर्थ
मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ असून या राशीचा धाडसी स्वभाव, झपाट्याने निर्णय घेण्याची वृत्ती आणि सतत काहीतरी करून दाखवण्याची ऊर्जा असते. मात्र कधी-कधी अधीरता, उतावळेपणा आणि तणावामुळे ही ऊर्जा विस्कळीत होऊ शकते. म्हणूनच मेष राशीच्या ऊर्जेला अधिक संतुलित, स्थिर आणि केंद्रित ठेवण्यासाठी खास निवडलेल्या रेड जॅस्पर आणि टायगर आयपासून हे ब्रेसलेट तयार करण्यात आले आहे. रेड जॅस्पर हे मेष राशीच्या तीव्र ऊर्जेला संतुलित ठेवण्यास आणि भावनिक स्थैर्याला प्रोत्साहन देते. तर टायगर आय हा धैर्य, एकाग्रता आणि आत्मविश्वासाशी जोडला जाणारा क्रिस्टल आहे. स्पष्ट विचार करून निर्णय घेण्याची आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवण्याची भावना मजबूत करण्यासाठी याचा वापर केला जातो.
हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.
ब्रेसलेटचे फायदे
स्पष्ट विचारांना आधार देते
एकाग्रता आणि शिस्त सुधारते
आत्मविश्वास आणि धैर्य वाढवते
दैनंदिन जीवनात उत्साही राहण्यास मदत करते
तणावाच्यावेळी शांत आणि स्थिर राहण्यास मदत करते
ब्रेसलेट कसे घालावे?
सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या
शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे
या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवा. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात
सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे ब्रेसलेट डाव्या हातात धारण करा
धारण करण्यापूर्वी शांतता, स्थिरता आणि भावनिक समतोल यांसारखा एखादा संकल्प करा
ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?
ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा
ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका
कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा
कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो
साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा
एकाग्रता, आत्मविश्वास आणि आंतरिक संतुलनाला आधार देणारे मेष राशीसाठी खास क्रिस्टल ब्रेसलेट
(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

