top of page

ब्लॅक मेटल धनयोग ब्रेसलेट

₹1,499.00 Regular Price
₹849.00Sale Price
Quantity

अर्थ

संपत्ती, यश आणि आर्थिक स्थैर्याच्या सकारात्मक भावनेला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेले ब्लॅक मेटल धनयोग ब्रेसलेट हे आकर्षक डिझाइन आणि विविध क्रिस्टल्सचा सुंदर संगम आहे. उच्च दर्जाचे क्रिस्टल्स (टायगर आय, पायराइट, सिट्रिन, क्लिअर क्वार्ट्ज आणि ग्रीन ॲव्हेंचरिन) आणि ब्लॅक-प्लेटेड, गंजरोधक धातू यामुळे हे ब्रेसलेट दिसायला आकर्षक आणि दैनंदिन वापरासाठीही सोयीस्कर ठरते. हे ब्रेसलेट आर्थिक समृद्धी आकर्षित करते, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढवते, संपत्ती आणि यशाचे प्रतीक आहे.


ब्रेसलेटमध्ये वापरण्यात आलेले 5 खास क्रिस्टल्स:


पायराइट - समृद्धी आणि आर्थिक प्रगतीच्या सकारात्मक भावनेशी जोडला जाणारा क्रिस्टल

टायगर आय - धैर्य, आत्मविश्वास आणि ठाम निर्णयक्षमतेला प्रोत्साहन देणारा क्रिस्टल.

सिट्रिन - समृद्धी, यश आणि नवीन आर्थिक संधींच्या संबंधित मानला जाणारा क्रिस्टल.

क्वार्ट्ज - स्पष्टता आणि सकारात्मक ऊर्जेसाठी वापरला जाणारा बहुपयोगी क्रिस्टल.

ग्रीन ॲव्हेंचरिन - नवीन संधी, प्रगती आणि यशाच्या सकारात्मक भावनेशी जोडला जाणारा क्रिस्टल.


पाच शक्तिशाली क्रिस्टल्सचा सुंदर संगम आणि प्रीमियम ब्लॅक-मेटल फिनिश यामुळे हे ब्रेसलेट स्टायलिशही वाटते आणि अर्थपूर्णही!


हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.


ब्रेसलेटचे फायदे

  • आर्थिक अडथळे दूर करते

  • नव्या संधींना आकर्षित करते

  • प्रगती, स्थैर्य आणि विपुलतेकडे वाटचाल

  • आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची प्रेरणा देते

  • शिस्त, एकाग्रता आणि यशाभिमुख विचारांना प्रोत्साहन देते

  • आर्थिक ध्येयांसाठी प्रयत्न करणाऱ्या पुरुषांसाठी अर्थपूर्ण आणि खास भेट


ब्रेसलेट कसे घालावे?

  • सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या

  • शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे

  • या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवा. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात

  • सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे ब्रेसलेट उजव्या हातात धारण करा

  • धारण करण्यापूर्वी शांतता, स्थिरता आणि सकारात्मकता यांसारखा एखादा संकल्प करा


ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?

  • ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • आठवड्यातून एकदा ब्रेसलेट 'रॉ सेलेनाइट प्लेट'वर ठेवा किंवा कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा

  • आंघोळ करताना किंवा झोपताना हे ब्रेसलेट घालणे टाळा


हे फक्त एक ब्रेसलेट नाही, तर समृद्धी, प्रगती आणि मोठ्या स्वप्नांच्या दिशेने उचलेले सकारात्मक पाऊल!


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page