top of page

कर्क रास - हाऊलाइट आणि मिल्की क्वार्ट्ज ब्रेसलेट

₹1,499.00 Regular Price
₹799.00Sale Price
Quantity

अर्थ

कर्क राशीचे लोक स्वभावाने प्रेमळ, संवेदनशील आणि भावनिक असतात. ते इतरांसाठी मनापासून सर्वकाही करतात, पण अनेकदा याच भावनांचं ओझं त्यांच्या मनावर येतं. अशा वेळी भावनिक संतुलन आणि मनःशांतीची साथ देण्यासाठी हे खास हाऊलाइट आणि मिल्की क्वार्ट्ज ब्रेसलेट तयार करण्यात आले आहे. हाऊलाइट हे मनाला शांत ठेवण्यास, तणाव कमी करण्यास आणि भावनांमध्ये संतुलन राखण्यास मदत करते तर मिल्की क्वार्ट्ज मनातील गोंधळ कमी करून शांतता, सकारात्मकता आणि अंतर्मनातील स्थैर्याची भावना वाढवण्यास सहाय्यक मानले जाते.


या दोन्ही क्रिस्टल्सचे संयोजन भावनिक स्थिरता, मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा जोपासण्यास मदत करते.


ब्रेसलेटचे फायदे

  • संवेदनशील भावनांना शांत करते

  • भावनिक तणाव कमी करण्यास मदत करते

  • मन शांत आणि प्रसन्न ठेवण्यास मदत करते

  • अतिविचार कमी करण्यास मदत करते

  • आंतरिक शांतता वाढवते


ब्रेसलेट कसे घालावे?

  • सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या

  • शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे; या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवावे. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात

  • सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे डाव्या हातात धारण करा

  • धारण करण्यापूर्वी शांतता, स्थिरता आणि भावनिक समतोल यांसारखा एखादा संकल्प करा


ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?

  • ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page