top of page

मकर रास - गार्नेट आणि मिल्की क्वार्ट्ज ब्रेसलेट

₹1,499.00 Regular Price
₹799.00Sale Price
Quantity

अर्थ

मकर राशीचा स्वामी ग्रह शनि मानला जातो. मकर राशीचे लोक शिस्तप्रिय, जबाबदार आणि ध्येय-केंद्रित असतात. मात्र सततची धावपळ, जबाबदाऱ्या आणि भावनिक तणावामुळे कधी कधी मनावर जडपण येऊ शकते. यासाठी मकर राशीच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं, आंतरिक शक्ती आणि भावनिक संतुलनाच्या भावनेला आधार देणारं खास गार्नेट आणि मिल्की क्वार्ट्ज क्रिस्टल्सपासून तयार करण्यात आलेलं ब्रेसलेट. ब्रेसलेटमधील गार्नेट हे लवचिकता, आत्मबळ आणि स्थिरतेशी जोडले जाते. आव्हानांच्या काळात खंबीर राहण्याची आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवण्याची प्रेरणा देणारा क्रिस्टल म्हणून त्याकडे पाहिले जाते. तर मिल्की क्वार्ट्ज हे शांतता आणि भावनिक संतुलनाशी जोडले जाते. सततच्या विचारांमधून थोडा विराम घेऊन मनाला स्थिरता देण्याच्या भावनेला ते साथ देते.


हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.


ब्रेसलेटचे फायदे

  • भावनिक जडत्व दूर करते

  • मानसिक समतोल सुधारते

  • स्थिरता आणि एकाग्रता वाढवते

  • सकारात्मक वाटचालीसाठी प्रोत्साहित करते

  • भावनिकदृष्ट्या खंबीर राहण्यास मदत करते


ब्रेसलेट कसे घालावे?

  • सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या

  • शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे

  • या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवा. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात

  • सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे ब्रेसलेट डाव्या हातात धारण करा

  • धारण करण्यापूर्वी शांतता, स्थिरता आणि भावनिक समतोल यांसारखा एखादा संकल्प करा


ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?

  • ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा


मकर राशीच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं, तुमच्या रोजच्या आयुष्यातील खास क्रिस्टल ब्रेसलेट.


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page