Carnelian Moon Pendant
कार्नेलियनच्या मोहक केशरी-लाल छटा आणि अर्धचंद्राची नाजूक रचना यांचा सुंदर मिलाफ म्हणजे कार्नेलियन मून पेंडेंट. या सुंदर रत्नाचं पेंडंट तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आकर्षक लुक देण्यासोबतच तुमच्या स्टाइलमध्ये एक खास सकारात्मक भावही जोडतं. कार्नेलियन हा उत्कटता, धैर्य, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचं प्रतीक मानला जातो. त्याचा ऊर्जावान रंग नव्या कल्पनांची, उत्साहाची आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आठवण करून देतो. तर चंद्रकोरीचा आकार नवीन सुरुवात, अंतर्ज्ञान आणि वैयक्तिक वाढीचं प्रतीक आहे. या दोन्हींचा सुंदर संगम या पेंडेंटला केवळ एक दागिना न ठेवता, तुमच्या बदलत्या प्रवासाची आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याच्या संकल्पाची अर्थपूर्ण आठवण बनवतो.
स्वतःसाठी असो किंवा एखाद्या खास व्यक्तीसाठी, हे पेंडेंट धैर्य, सर्जनशीलता आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आठवण जपणारी एक सुंदर भेट ठरू शकते.
हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.
पेंडेंटचे फायदे
प्रत्येक दिवसाकडे नव्या उमेदीनं पाहण्याची प्रेरणा
भीती बाजूला ठेवून नव्या संधी स्वीकारण्याची प्रेरणा
तुमच्यातील कल्पकतेला व्यक्त करण्यासाठी एक खास प्रतीक
स्वतःच्या भावना आणि इच्छांकडे सजगतेने पाहण्याची आठवण
आयुष्यातील बदल, नव्या संधी आणि वैयक्तिक प्रगतीचं प्रतीक
एखाद्या प्रिय व्यक्तीला अर्थपूर्ण भेट देण्यासाठी एक सुंदर पर्याय
पेंडेंटची काळजी कशी घ्यावी?
पेंडेंटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका
आंघोळ करताना किंवा झोपताना हे पेंडेंट घालणे टाळा
पेंडेंट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा
साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा
पेंडेंटवर स्क्रॅच पडू नये म्हणून स्वतंत्र पावूचमध्ये ठेवा
कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो
सेलेनाइट प्लेटवर किंवा कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा
कार्नेलियन नॅचरल क्रिस्टल मून पेंडेंट - तुमच्या शैलीत तेज, विचारांत सर्जनशीलता आणि प्रत्येक नव्या सुरुवातीसाठी आत्मविश्वासाची प्रेरणा!
(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

