सिट्रीन स्टोन
अर्थ
सिट्रीन हे पिवळ्या रंगाचे रत्न आहे, जे सकारात्मकता, उत्साह आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी ओळखले जाते. तसेच आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि ऊर्जा वाढवण्यास हे रत्न मदत करते. सिट्रीन हे सहसा सोने, चांदीच्या अंगठ्यांमध्ये अथवा पेंडंटमध्ये धारण केले जाते. पाणी, घाम किंवा अत्तराच्या वारंवार संपर्कात येऊ देऊ नका. रत्नाची चमक दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी ते कोरडे ठेवावे.
फायदे
धनसंपदा, समृद्धी आणि यश आकर्षित करते
ताणतणाव आणि नकारात्मक विचार कमी करण्यास मदत करते
सकारात्मकता आणि आशावाद वृद्धिंगत करते
सर्जनशीलता आणि आत्मशक्तीमध्ये वाढ करते
एकाग्रता सुधारण्यास मदत करते
सिट्रीनचा वापर कसा करावा?
धारण करण्यापूर्वी हा रत्न शुद्ध करून घ्यावा
त्यासाठी कच्चे दूध, मध आणि गंगाजल यांचा वापर करावा
स्वच्छ केल्यानंतर रत्न हातात धरून "ॐ बृहस्पतये नमः" या मंत्राचा १०८ वेळा जप करावा
शक्यतो सोने किंवा चांदीच्या अंगठीत हे रत्न धारण करावा
तसेच गुरुवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर धारण करावा
सिट्रीनची काळजी कशी घ्यावी?
स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करावा
साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा
सेलेनाइट प्लेटवर किंवा कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करावे
स्क्रॅच पडू नये म्हणून रत्न मऊ कपड्यात गुंडाळून ठेवा
कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे रत्नाचा रंग उडू शकतो

