top of page

Crystal Turtle with Plate

₹999.00 Regular Price
₹899.00Sale Price
Quantity

क्लियर क्वार्ट्जपासून तयार करण्यात आलेली कासवाच्या आकारातील ही सुंदर आणि सुबक मूर्ती स्थिरता, शांतता आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. क्लियर क्वार्ट्जला क्रिस्टल परंपरेत ‘मास्टर हीलर’ म्हणून ओळखलं जातं. तो स्पष्टता, शुद्धता आणि ऊर्जेच्या संतुलनाशी संबंधित मानला जातो. तर कासवाला दीर्घायुष्य, स्थिरता, संयम आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. या दोन्हींचा सुंदर संगम असलेली ही मूर्ती शांत, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैलीची आठवण करून देते. क्रिस्टलसारखा चमकदार लूक आणि सोबत असलेली आकर्षक सजावटीची प्लेट यामुळे या कासवाला मिळतो एक खास एलिगंट टच. घर असो वा ऑफिस, हे डेकोरेटिव्ह पीस तुमच्या जागेच्या सौंदर्यात भर घालतं.


गृहप्रवेश, दिवाळी किंवा इतर खास प्रसंगी हे क्रिस्टल कासव ठरू शकतं एक सुंदर आणि अर्थपूर्ण गिफ्ट!


फायदे

  • मानसिक स्पष्टता, एकाग्रता वाढवते

  • स्थिरता, संयम आणि सातत्याचं प्रतीक

  • संतुलित व सकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन

  • दीर्घायुष्य आणि जीवनातील निरंतर प्रगतीचे प्रतीक

  • नकारात्मक ऊर्जेला दूर करते आणि ऊर्जेचा प्रवाह सुधारते

  • शांतता, संतुलन आणि प्रगतीची शुभेच्छा देण्यासाठी खास भेट


काळजी कशी घ्यावी?

  • स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करावा

  • स्क्रॅच पडू नये म्हणून क्रिस्टल मऊ कपड्यात गुंडाळून ठेवा

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे क्रिस्टल्सचा रंग उडू शकतो

  • सेलेनाइट प्लेटवर किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करावे


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page