top of page

Dhanyog Earrings

₹699.00 Regular Price
₹599.00Sale Price
Quantity

आर्थिक प्रगती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेची प्रेरणा देणाऱ्या संकल्पनेतून तयार केलेले धनयोग इयररिंग्स हे नैसर्गिक स्फटिकांच्या आकर्षक रंगसंगतीने सजलेले एक खास ॲक्सेसरी आहे. ग्रीन ॲव्हेंचरिन, सिट्रीन, पायराईट, टायगर आय, क्लिअर क्वार्ट्झ यांसारख्या स्फटिकांच्या समावेशामुळे इयररिंग्सला एक वेगळं सौंदर्य आणि समृद्धीशी जोडलेलं प्रतीकात्मक महत्त्व प्राप्त होतं. प्रत्येक स्फटिकाची स्वतंत्र ओळख आणि त्याच्याशी जोडलेली पारंपरिक मान्यता या इयरिंग्सला खास बनवते. स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी आणि यशाच्या प्रवासाची आठवण मनात ठेवण्यासाठी हे इयररिंग्स तुमच्यासाठी एक अर्थपूर्ण साथीदार ठरू शकते.


ऑफिसमधील रोजचा लुक असो, मित्रमैत्रिणींसोबतची भेट असो किंवा एखादा खास सोहळा — हे इयररिंग्स तुमच्या व्यक्तिमत्त्वाला देतील एक एलिगंट आणि युनिक लुक.


हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.


इयररिंग्सचे फायदे

  • आत्मविश्वासाची प्रेरणा

  • ध्येयांवर लक्ष केंद्रित प्रेरित करते

  • सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करते

  • दैनंदिन जीवनात सुसंवाद साधण्यास मदत करते

  • धैर्य, दृढनिश्चयाचे प्रतीक मानले जाते

  • भरभराट, संधी आणि समृद्धी आकर्षित करते


इयररिंग्सची काळजी कशी घ्यावी?

  • इयररिंग्सचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • आंघोळ करताना किंवा झोपताना हे इयररिंग्स घालणे टाळा

  • इयररिंग्स स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा

  • इयररिंग्समधील बीड्सवर स्क्रॅच पडू नये म्हणून स्वतंत्र पावूचमध्ये ठेवा

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page