top of page

मिथुन रास - ग्रीन ॲव्हेंचरिन आणि मिल्की क्वार्ट्ज ब्रेसलेट

₹1,499.00 Regular Price
₹799.00Sale Price
Quantity

अर्थ

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. जिज्ञासू मन, सतत नवनवीन कल्पना आणि वेगाने विचार करण्याची क्षमता, ही मिथुन राशीची खासियत. मात्र सततचे विचार, अस्वस्थता आणि मानसिक ताणामुळे कधी कधी एकाग्रता आणि स्पष्ट विचारांवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मिथुन राशीच्या ऊर्जेला अनुरूप असे ग्रीन ॲव्हेंचरिन आणि मिल्की क्वार्ट्ज क्रिस्टल्सपासून बनवलेले हे खास ब्रेसलेट आहे. ग्रीन ॲव्हेंचरिन हे सकारात्मकता, आत्मविश्वास आणि संतुलित निर्णय घेण्याच्या भावनेला प्रोत्साहन देणारा क्रिस्टल आहे. तर मिल्की क्वार्ट्ज मनातील विचारांचा गोंधळ कमी करण्यास आणि शांत, स्पष्ट विचारांची भावना निर्माण करण्यास मदत करणारा क्रिस्टल आहे.


हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.

ब्रेसलेटचे फायदे

  • भावनांचा समतोल राखते

  • अस्वस्थ मनाला शांत करते

  • एकाग्रता आणि स्पष्टता वाढवते

  • सकारात्मक निर्णयांना प्रोत्साहन देते

  • दिवसभर सक्रिय आणि शिस्तबद्ध राहण्यास मदत करते


ब्रेसलेट कसे घालावे?

  • सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या

  • शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे

  • या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवा. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात

  • सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे ब्रेसलेट डाव्या हातात धारण करा

  • धारण करण्यापूर्वी शांतता, स्थिरता आणि भावनिक समतोल यांसारखा एखादा संकल्प करा


ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?

  • ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा


मिथुन राशीच्या चंचल विचारांना संतुलनाचा स्पर्श देण्यासाठी खास क्रिस्टल ब्रेसलेट


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page