top of page

श्री गणेश आणि माता लक्ष्मी पायराइट डस्ट मूर्ती

₹699.00 Regular Price
₹599.00Sale Price
Quantity

संपत्ती आकर्षित करण्यासाठी आणि जीवनातील सर्व अडथळे दूर करण्याच्या भावनेने पायराइटच्या कणांपासून श्री गणेशाची आणि माता लक्ष्मीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धी आणि शुभारंभाचे प्रतीक मानले जातात, तर देवी लक्ष्मी या धन, वैभव आणि समृद्धीच्या अधिष्ठात्री मानल्या जातात. तसेच पायराइट हा विपुलता, आत्मविश्वास आणि पैशांचा ओघ वाढवणारा क्रिस्टल मानला जातो. त्याच्या आकर्षक धातूसदृश झळाळीमुळे या मूर्तींना एक वेगळेच स्वरूप प्राप्त होते. या दोघांची उपस्थिती घरात सुख-शांती आणि ऐश्वर्य आणते, नकारात्मक ऊर्जा दूर करते.


फायदे

  • आत्मविश्वास उंचावते

  • ज्ञान, विवेक, शुभारंभाचे प्रतीक

  • यशातील सर्व अडथळे दूर करते

  • सुदैव आणि सौभाग्य घेऊन येते

  • संपत्ती, सुख आणि आर्थिक समृद्धीचे प्रतीक

  • घरातील नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता आणते


कुठे आणि कोणत्या दिशेला ठेवावे?

  • आर्थिक प्रगती आणि करिअरच्या संधी आकर्षित करण्यासाठी उत्तर दिशेला ठेवावे

  • ईशान्य दिशेला ठेवल्यास निर्णयक्षमता सुधारते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो

  • कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसच्या डेस्कवर ठेवल्यास एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो


काळजी कशी घ्यावी?

  • थेट पाण्याच्या संपर्कात येऊ देऊ नका

  • स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करावा

  • स्क्रॅच पडू नये म्हणून मऊ कपड्यात गुंडाळून ठेवा

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे रंग उडू शकतो


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page