मनी मॅग्नेट ट्री (Money Magnet Tree)
अर्थ
तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये समृद्धी, सकारात्मकता आणि प्रगतीचे प्रतीक ठरेल असा हा मनी मॅग्नेट ट्री. रत्नजडित पानांनी सजलेले हे आकर्षक ट्री केवळ एक शोपीस नाही, तर वृद्धी, यश आणि नव्या संधींचे प्रतीक म्हणून अनेकजण आपल्या कामाच्या ठिकाणी आणि घरात ठेवणे पसंत करतात. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे वेगवेगळ्या रत्नांनी हे तयार करण्यात आले आहे. सिट्रीन सकारात्मकता आणि यशाचे प्रतीक आहे, ग्रीन ॲव्हेंट्युरिन नव्या संधी आणि प्रगतीचे प्रतीक आहे, ग्रीन जेड संतुलन आणि समृद्धीचे प्रतीक आहे, टायगर आय आत्मविश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी प्रेरणा देणारा क्रिस्टल म्हणून ओळखला जातो.
मनी मॅग्नेट ट्रीचे फायदे
आर्थिक वृद्धी आणि संधी आकर्षित करते
ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते
तुमच्या अवतीभवती चैतन्यमय ऊर्जा निर्माण करते
कौटुंबिक शांतता आणि सुसंवाद वाढवते
सकारात्मक स्पंदने आकर्षित करते
मनी मॅग्नेट ट्री कुठे ठेवावे?
मनी मॅग्नेट ट्री कामाच्या ठिकाणी, घरात किंवा दुकानाच्या काउंटरवर ठेवू शकता
तुम्हाला दररोज लक्ष केंद्रित करण्यास, सकारात्मक राहण्यास व कार्यक्षम राहण्यास प्रेरित करते
तुम्ही हे मित्र आणि नातेवाईकांना एक भेटवस्तू म्हणूनही देऊ शकता
काळजी कशी घ्यावी?
मनी मॅग्नेट ट्री स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवा
तसेच, याचा पाणी किंवा ओलाव्याशी संपर्क टाळा
मऊ आणि कोरड्या कापडाने हलक्या हाताने पुसून स्वच्छ करा
घातक रसायने किंवा क्लिनर्सचा वापर करू नका
याचा रंग आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी थेट सूर्यप्रकाशात ठेवणे टाळा
(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

