top of page

ओम पद्मिनी ब्रेसलेट (Om Padmini Bracelet)

₹1,499.00 Regular Price
₹899.00Sale Price
Quantity

पवित्र “ओम मणि पद्मे हम” मंत्राशी एकरूप असलेले हे ब्रेसलेट, ऊर्जा संरेखन आणि भावनिक संतुलनास प्रोत्साहन देणाऱ्या तेजस्वी रत्नांनी तयार केले आहे. तसेच हे ब्रेसलेट कमळाशी संबंधित आहे, जे देवी लक्ष्मीचे प्रिय आसन आहे. त्यामुळे ते धनधान्य, समृद्धी आकर्षित करते. यातील रत्न करुणेला जागृत करून तिचे संगोपन करतात, ज्यामुळे सकारात्मक गुण विकसित होतात आणि परिणामी, व्यक्तीच्या जीवनात आनंद वाढतो.


ओम पद्मिनी ब्रेसलेटचे फायदे

  • भावनिक संतुलन राखण्यास मदत करते

  • अंतर्गत शांती वाढवते आणि तणाव कमी करते

  • घरात आणि व्यवसायात सुख-समृद्धीचे आगमन होते

  • व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास सुधारण्यास मदत करते

  • आर्थिक संधी निर्माण करते


ओम पद्मिनी ब्रेसलेट कसे घालावे?

  • सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या.

  • शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे; या पाण्यात ब्रेसलेट काही तासांसाठी भिजत ठेवावे. यामुळे ब्रेसलेट स्वच्छ होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात.

  • 'ओम पद्मिनी ब्रेसलेट' आपल्या दोन्ही हातांमध्ये धरून ध्यान करावा

  • त्यानंतर हे ब्रेसलेट डाव्या हातात धारण करावे.


ओम पद्मिनी ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?

  • ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करावा

  • ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करावे

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page