मीन रास - सिट्रिन आणि टायगर आय ब्रेसलेट
अर्थ
मीन राशीचे लोक स्वभावाने भावनिक, संवेदनशील आणि अंतर्मुख असतात. त्यामुळे कधी कधी अतिविचार, भावनिक थकवा किंवा मनातील गोंधळ जाणवू शकतो. म्हणूनच मीन राशीसाठी सिट्रिन आणि टायगर आय या क्रिस्टल्सपासून हे ब्रेसलेट खास तयार करण्यात आले आहे. जे संरक्षण, स्थिरता आणि आत्मविश्वासाच्या भावनेला आधार देतात. सिट्रिन हा सकारात्मकतेची भावना वाढवण्यास, आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्यास आणि उत्साही विचारांना साथ देण्यासाठी ओळखला जाणारा क्रिस्टल आहे. तर टायगर आय मनाला स्थिरता देण्यास, भावनिक संतुलन राखण्यास आणि आंतरिक सामर्थ्य व आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.
ब्रेसलेटचे फायदे
आत्मविश्वास वाढवते
भावनांना संतुलित ठेवते
संवेदनशील ऊर्जेचे रक्षण करते
शांतता, स्थिरता वाढवण्यास प्रोत्साहन देते
सकारात्मकदृष्ट्या उत्साही राहण्यास मदत करते
ब्रेसलेट कसे घालावे?
सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या
शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे
या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवा. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात
सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे ब्रेसलेट डाव्या हातात धारण करा
धारण करण्यापूर्वी शांतता, स्थिरता आणि भावनिक समतोल यांसारखा एखादा संकल्प करा
ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?
ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा
ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका
कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा
कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो
साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा
सकारात्मकता, भावनिक संतुलन, स्थिरता आणि आत्मविश्वासाचा स्पर्श देण्यासाठी मीन राशीसाठी खास क्रिस्टल ब्रेसलेट
(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

