Pyrite Owl
घुबड म्हणजे देवी लक्ष्मीचं वाहन. अस्सल पायराइटपासून तयार करण्यात आलेली घुबडाच्या आकारातील ही मूर्ती केवळ सजावटीसाठी नाही, तर त्यामागे दडलेलं आहे बुद्धिमत्ता, विवेक आणि समृद्धीचं प्रतीकात्मक महत्त्व. घुबड हे ज्ञान, दूरदृष्टी आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याशी संबंधित मानलं जातं. योग्य संधी ओळखण्याची आणि समजूतदारपणे पुढे जाण्याची आठवण करून देणारं हे प्रतीक. तर पायराइटला पारंपरिक क्रिस्टल मान्यतांमध्ये संपत्ती, विपुलता आणि आत्मविश्वासाशी जोडलं जातं. त्याचा सोनेरी, धातूसारखा चमकदार लुक या मूर्तीला खास आकर्षण देतो. आकर्षक कलाकुसर, घुबडाचं प्रतीकात्मक महत्त्व आणि पायराइटचा रॉयल लुक यांचा सुंदर मिलाफ म्हणजे पायराइट आउल. घुबडाची बारकाईने घडवलेली रचना आणि पायराइटचा चमकदार, धातूसारखा लुक तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या सजावटीत एक वेगळीच शोभा आणतो.
फायदे
दूरदृष्टी आणि सजगतेची आठवण करून देते
घर, ऑफिसमध्ये सुसंवाद आणि स्थिरता आणते
संपत्ती आणि करिअरच्या नवीन संधी आकर्षित करते
बचतीची जाणीव आणि संपत्तीचं जतन करण्याची प्रेरणा
वाईट नजर आणि नकारात्मकतेपासून संरक्षणाचं प्रतीक
व्यवसायातील संधी ओळखताना विचारपूर्वक निर्णय घेण्याची प्रेरणा
कुठे आणि कोणत्या दिशेला ठेवावे?
आर्थिक प्रगती आणि करिअरच्या संधी आकर्षित करण्यासाठी उत्तर दिशेला ठेवावे
ईशान्य दिशेला ठेवल्यास निर्णयक्षमता सुधारते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो
कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसच्या डेस्कवर ठेवल्यास एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो
घुबडाचा चेहरा घराच्या किंवा ऑफिसच्या आतल्या बाजूला असावा, जे यश आणि समृद्धीच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते
काळजी कशी घ्यावी?
स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करावा
थेट पाण्याच्या संपर्कात क्रिस्टल येऊ देऊ नका
स्क्रॅच पडू नये म्हणून क्रिस्टल मऊ कपड्यात गुंडाळून ठेवा
साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा
कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे क्रिस्टलचा रंग उडू शकतो
सेलेनाइट प्लेटवर किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करावे
(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

