पायराइट स्टोन
‘संपत्ती आणि विपुलतेचा दगड’ म्हणून ओळखला जाणारा पायराइट, आपल्या आकर्षक सोनेरी झळाळीमुळे प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतो. आर्थिक प्रगती, यश, आत्मविश्वास आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण यांच्याशी पायराइटचा संबंध जोडला जातो. ज्योतिषीय मान्यतेनुसार, त्याचा संबंध शनिशीही जोडला जातो. आव्हानात्मक काळात स्थैर्य, संयम आणि शिस्तीची आठवण करून देणारा हा क्रिस्टल तुमच्या घरासाठी किंवा वर्क डेस्कसाठी उत्तम आहे. समृद्धीची भावना, आत्मविश्वासाची प्रेरणा आणि नैसर्गिक सौंदर्य, या सगळ्यांचा सुंदर संगम म्हणजे पायराइट स्टोन.
हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहे, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.
पायराइट स्टोनचे फायदे
पैसा, समृद्धी आणि नव्या संधींचं प्रतीक
ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करण्याची प्रेरणा
कामात शिस्त, एकाग्रता आणि प्रगतीची आठवण
कठीण काळात संयम, जबाबदारी आणि स्थिरतेचं प्रतीक
नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळत असल्याची पारंपरिक मान्यता
पायराइट स्टोन कुठे आणि कोणत्या दिशेला ठेवावे?
कॅश ड्रॉवर किंवा लॉकरजवळ ठेवावे
वर्क डेस्क किंवा ऑफिस टेबलवर ठेवू शकता
बाथरूम आणि दमट जागी ठेवण्याचे टाळावे
घराच्या किंवा ऑफिसच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात ठेवावे
पायराइट स्टोनची काळजी कशी घ्यावी?
स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करावा
थेट पाण्याच्या संपर्कात क्रिस्टल येऊ देऊ नका
स्क्रॅच पडू नये म्हणून क्रिस्टल मऊ कपड्यात गुंडाळून ठेवा
साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा
कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे रत्नाचा रंग उडू शकतो
सेलेनाइट प्लेटवर किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करावे
(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

