top of page

Rose Quartz Moon Pendant

₹799.00 Regular Price
₹699.00Sale Price
Quantity

चंद्राची मोहकता आणि रोज क्वार्ट्चीज कोमलता, तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक खास आध्यात्मिक स्पर्श देण्यासाठी नैसर्गिक रोज क्वार्ट्ज क्रिस्टल्सपासून अर्धचंद्राच्या आकारात हे पेंडेंट तयार करण्यात आले आहे. प्रेमाचा दगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोज क्वार्ट्जला प्रेम, करुणा, आत्मप्रेम आणि भावनिक सुसंवाद यांचं प्रतीक मानलं जातं. त्याची सौम्य रंगछटा या पेंडेंटला एक मोहक, शांत आणि कालातीत सौंदर्य प्रदान करते. तर अर्धचंद्राचं आकर्षक डिझाइन अंतर्ज्ञान, परिवर्तन, स्त्रीत्व, वैयक्तिक वाढ आणि नव्या सुरुवातींचं प्रतीक आहे. या दोन्हींचा सुंदर मिलाफ या पेंडेंटला एक नाजूक, मिस्टिकल आणि अर्थपूर्ण ओळख देतो.


स्वतःसाठी असो किंवा एखाद्या खास व्यक्तीसाठी, हे पेंडेंट प्रेम, आपुलकी आणि नव्या सुरुवातींची आठवण जपणारी एक सुंदर भेट ठरू शकते.


हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.


पेंडेंटचे फायदे

  • नात्यांमध्ये समजूतदारपणा आणते

  • स्वतःवर प्रेम करण्यासाठी प्रेरित करतं

  • ध्यान, आत्मचिंतन आणि शांतता राखते

  • प्रेमळ भावना आणि सकारात्मकतेशी जोडतो

  • आयुष्यातील बदल, नव्या संधी आणि वैयक्तिक प्रगतीचं प्रतीक

  • एखाद्या प्रिय व्यक्तीला अर्थपूर्ण भेट देण्यासाठी एक सुंदर पर्याय


पेंडेंटची काळजी कशी घ्यावी?

  • पेंडेंटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • आंघोळ करताना किंवा झोपताना हे पेंडेंट घालणे टाळा

  • पेंडेंट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा

  • पेंडेंटवर स्क्रॅच पडू नये म्हणून स्वतंत्र पावूचमध्ये ठेवा

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो

  • सेलेनाइट प्लेटवर किंवा कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा


रोज क्वार्ट्ज नॅचरल क्रिस्टल मून पेंडेंट - स्वतःवर प्रेम करण्याची, बदलांना स्वीकारण्याची आणि प्रत्येक नव्या सुरुवातीचं सौंदर्य अनुभवण्याची एक सुंदर आठवण!


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page