top of page

धनु रास - ब्लॅक ऑब्सिडियन आणि लॅपिस लाझुली ब्रेसलेट

₹1,499.00 Regular Price
₹799.00Sale Price
Quantity

अर्थ

धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु मानला जातो. स्वातंत्र्यप्रिय, साहसी आणि सतत काहीतरी नवीन अनुभवण्याची इच्छा असणाऱ्या धनु राशीच्या व्यक्तींची ऊर्जा नेहमीच गतिमान असते. मात्र, हीच अस्वस्थता कधी कधी एकाग्रता, मानसिक स्पष्टता आणि योग्य दिशेवर लक्ष केंद्रित करण्यात अडथळा आणू शकते. त्यासाठी ब्लॅक ऑब्सिडियन आणि लॅपिस लाझुली या खास निवडलेल्या क्रिस्टल्सपासून हे ब्रेसलेट तयार करण्यात आले आहे. जे स्थिरता, स्पष्टता आणि संतुलित विचारांना पूरक ठरते. ब्लॅक ऑब्सिडियन नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणाची भावना देत मनाला स्थिर ठेवण्यास मदत करते. तर लॅपिस लाझुली स्पष्ट विचार, आत्मपरीक्षण आणि शहाणपणाच्या भावनेला प्रोत्साहन देते.


हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.


ब्रेसलेटचे फायदे

  • अस्वस्थ ऊर्जेला स्थिर करते

  • नकारात्मकतेपासून संरक्षण करते

  • आंतरिक मार्गदर्शनास साहाय्य करते

  • विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत करते

  • स्वातंत्र्य आणि एकाग्रता यांचा समतोल साधते


ब्रेसलेट कसे घालावे?

  • सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या

  • शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे

  • या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवा. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात

  • सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे ब्रेसलेट डाव्या हातात धारण करा

  • धारण करण्यापूर्वी शांतता, स्थिरता आणि भावनिक समतोल यांसारखा एखादा संकल्प करा


ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?

  • ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा


धनु राशीच्या ऊर्जेला स्थिरता, स्पष्टता आणि सकारात्मकता देण्यासाठी खास क्रिस्टल ब्रेसलेट


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page