वृश्चिक रास - ब्लॅक ऑब्सिडियन आणि मिल्की क्वार्ट्ज ब्रेसलेट
अर्थ
वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ असून या राशीचे लोक भावनाशील, जिद्दी आणि तीव्र व्यक्तिमत्त्वाचे असतात. आजूबाजूचं वातावरण आणि ताणतणाव यांचा त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांना भावनिक स्थिरता आणि सकारात्मकतेची साथ देणारा क्रिस्टल कॉम्बिनेशन खास ठरू शकतो. ब्लॅक ऑब्सिडियन आणि मिल्की क्वार्ट्ज क्रिस्टल्सपासून बनवलेले हे ब्रेसलेट वृश्चिक राशीच्या ऊर्जेला अनुरूप आहे. ब्लॅक ऑब्सिडियन हा नकारात्मक प्रभावांपासून संरक्षणाची भावना निर्माण करण्यासाठी आणि भावनिक स्थैर्याला आधार देण्यासाठी पारंपरिकरित्या वापरला जातो. तर मिल्की क्वार्ट्ज मनाला शांतता आणि स्थिरतेची भावना देण्यासाठी तसेच तणावपूर्ण वातावरणात सकारात्मक विचारांना आधार देण्यासाठी वापरला जातो.
हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.
ब्रेसलेटचे फायदे
आंतरिक शक्ती वाढवते
तीव्र भावनांना संतुलित करते
मानसिक स्पष्टतेला आधार देते
नकारात्मकतेपासून वाचवण्यास मदत करते
एकाग्र, शांत आणि संतुलित राहण्यास मदत करते
ब्रेसलेट कसे घालावे?
सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या
शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे
या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवा. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात
सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे ब्रेसलेट डाव्या हातात धारण करा
धारण करण्यापूर्वी शांतता, स्थिरता आणि भावनिक समतोल यांसारखा एखादा संकल्प करा
ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?
ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा
ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका
कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा
कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो
साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा
शांतता, स्थिरता आणि सकारात्मकतेला आधार देणारे वृश्चिक राशीसाठी खास क्रिस्टल ब्रेसलेट.
(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

