सेलेनाइट प्लेट
तुमच्या आजूबाजूचं वातावरण अधिक शांत, प्रसन्न आणि सकारात्मक ठेवायचं आहे? मग ही सेलेनाइट प्लेट तुमच्या क्रिस्टल कलेक्शनमध्ये एक खास भर ठरू शकते. आपल्या सौम्य पांढऱ्या तेजासाठी आणि सुंदर नैसर्गिक स्वरूपासाठी ओळखली जाणारी ही सेलेनाइट प्लेट ध्यान, मेडिटेशन आणि शांत जीवनशैलीशी जोडलेल्या लोकांसाठी एक आकर्षक पर्याय आहे. उच्च दर्जाच्या सेलेनाइटपासून बनवलेली ही प्लेट क्रिस्टल्सची ऊर्जा शुद्ध करण्यासाठी, क्रिस्टल्सना चार्ज करण्यासाठी वापरली जाते. आध्यात्मिक मान्यतेनुसार सेलेनाइट सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धतेशी संबंधित मानले जाते. त्यामुळेच आध्यात्मिक साधक किंवा स्फटिकांची आवड असणाऱ्या प्रत्येकाकडे ही प्लेट असणे गरजेचे आहे.
सेलेनाइट प्लेटचे फायदे
मानसिक स्पष्टता आणते
मन शांत आणि तणावमुक्त ठेवते
इतर क्रिस्टल्स चार्ज करण्यासाठी उपयुक्त
नकारात्मकता दूर करून सकारात्मकता वाढवते
वातावरण संतुलित आणि प्रसन्न ठेवण्यास मदत करते
वारंवार cleansing किंवा charging करण्याची गरज नसते
प्लेटचा वापर कसा करावा?
तुमचे क्रिस्टल्स, दागिने (क्रिस्टल्सचे) किंवा छोटी आध्यात्मिक साधने ४ ते ६ तासासाठी सेलेनाइट प्लेटवर ठेवा
क्रिस्टल्सच्या cleansing आणि recharging साठी ही पद्धत क्रिस्टल परंपरेत वापरली जाते
ही प्लेट तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात, डेस्कवर किंवा पलंगाशेजारी ठेवू शकतात
हीलिंगच्या वेळी, ध्यानधारणा किंवा पौर्णिमेच्या रात्री याचा वापर करावा
सेलेनाइट प्लेटची काळजी कशी घ्यावी?
पाण्याच्या संपर्कात येऊ देऊ नका
ही प्लेट नेहमी कोरडी राहील याची काळजी घ्या
मऊ आणि कोरड्या कापडाने हलक्या हाताने पुसून स्वच्छ करा
सेलेनाइटला self-cleansing crystal मानले जाते
त्यामुळे इतर क्रिस्टल्सप्रमाणे त्याला वारंवार चार्ज करण्याची आवश्यकता नसते
सेलेनाइट मऊ असल्याने त्यावर ओरखडे पडणार नाही याची काळजी घ्या
(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

