सेलेनाइट श्रीयंत्र चार्जिंग प्लेट
पवित्र श्रीयंत्राची भूमितीय रचना आणि सेलेनाइटच्या नैसर्गिक गुणधर्मांचा सुंदर संगम म्हणजे सेलेनाइट श्रीयंत्र चार्जिंग प्लेट. आध्यात्मिक साधना, ध्यान आणि ऊर्जा शुद्धीकरणासाठी ही प्लेट एक विशेष साधन मानली जाते. श्रीयंत्र हे समृद्धी, विपुलता, सकारात्मकता आणि आध्यात्मिक उन्नतीशी जोडलेले पवित्र प्रतीक मानले जाते. सेलेनाइट नैसर्गिकरित्या नकारात्मकता दूर करते आणि आपल्या संकल्पांची किंवा हेतूंची तीव्रता वाढवते. तुमचे क्रिस्टल्स, ब्रेसलेट, माळा किंवा इतर क्रिस्टल दागिने ठेवून त्यांना पुन्हा ऊर्जावान (Recharge) करण्यासाठी ही प्लेट वापरली जाते. तसेच ध्यानाची जागा, पूजास्थळ किंवा आध्यात्मिक साधनेच्या ठिकाणी ठेवण्यासाठी उपयुक्त मानली जाते. त्यामुळेच आध्यात्मिक साधक किंवा स्फटिकांची आवड असणाऱ्या प्रत्येकाकडे ही प्लेट असणे गरजेचे आहे.
चार्जिंग प्लेटचे फायदे
विचारांमध्ये स्पष्टता आणते
मन शांत करते, एकाग्रता वाढवते
आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा दूर करते
इतर क्रिस्टल्स रिचार्ज करण्यासाठी उपयुक्त
वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न ठेवण्यास मदत करते
वारंवार cleansing किंवा charging करण्याची गरज नसते
प्लेटचा वापर कसा करावा?
तुमचे क्रिस्टल्स, दागिने (क्रिस्टल्सचे) किंवा छोटी आध्यात्मिक साधने ४ ते ६ तासासाठी सेलेनाइट प्लेटवर ठेवा
क्रिस्टल्सच्या cleansing आणि recharging साठी ही पद्धत क्रिस्टल परंपरेत वापरली जाते
ही प्लेट तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात, डेस्कवर किंवा पलंगाशेजारी ठेवू शकतात
हीलिंगच्या वेळी, ध्यानधारणा किंवा पौर्णिमेच्या रात्री याचा वापर करावा
प्लेटची काळजी कशी घ्यावी?
पाण्याच्या संपर्कात येऊ देऊ नका
ही प्लेट नेहमी कोरडी राहील याची काळजी घ्या
मऊ आणि कोरड्या कापडाने हलक्या हाताने पुसून स्वच्छ करा
सेलेनाइटला self-cleansing crystal मानले जाते
त्यामुळे इतर क्रिस्टल्सप्रमाणे त्याला वारंवार चार्ज करण्याची आवश्यकता नसते
सेलेनाइट तुलनेने मऊ असल्याने त्यावर ओरखडे पडणार नाही याची काळजी घ्या
(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

