Soulful Earrings
कधी स्वतःच्या क्षमतेवर शंका येते, कधी मनातल्या भावना व्यक्त करणं कठीण वाटतं, तर कधी रोजच्या धावपळीत स्वतःसाठी वेळच उरत नाही, अशा वेळी स्वतःची ताकद आणि स्वतःवरचं प्रेम आठवून देणारा एक छोटासा अलंकार तुमच्यासाठी खास ठरू शकतो. ते म्हणजे Shakti Aura Earrings, ज्यामध्ये ४ विविध क्रिस्टल्सचा समावेश आहे. टायगर आय आत्मविश्वास, धाडस आणि मानसिक ताकदीसाठी ओळखले जाते. रोज क्वार्ट्ज हे प्रेम, आपुलकी आणि स्वतःची काळजी घेण्याची आठवण करून देतो. कार्नेलियन उत्साह, सर्जनशीलता आणि नव्या उमेदेशी जोडला जातो, तर टर्कॉइज शांतता, संरक्षण आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं.
या चारही क्रिस्टल्सची रंगसंगती तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच उठाव देते. रोजच्या साध्या आउटफिटपासून ते खास प्रसंगांतील इंडो-वेस्टर्न लुकपर्यंत, हे इयररिंग्स तुमच्या स्टाइलमध्ये भर घालण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.
इयररिंग्सचे फायदे
आत्मविश्वासाची प्रेरणा
ध्येयांवर लक्ष केंद्रित प्रेरित करते
धैर्य, दृढनिश्चयाचे प्रतीक मानले जाते
स्वतःशी प्रेमाने वागण्याची आठवण करून देते
उत्साह, सर्जनशीलता आणि कृतीशीलतेचं प्रतीक
विचार स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडण्याची क्षमता
इयररिंग्सची काळजी कशी घ्यावी?
इयररिंग्सचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका
आंघोळ करताना किंवा झोपताना हे इयररिंग्स घालणे टाळा
इयररिंग्स स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा
साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा
इयररिंग्समधील बीड्सवर स्क्रॅच पडू नये म्हणून स्वतंत्र पावूचमध्ये ठेवा
कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो
(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

