वृषभ रास - सनस्टोन आणि कार्नेलियन ब्रेसलेट
अर्थ
वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र मानला जातो. शांत, स्थिर आणि विश्वासार्ह स्वभाव ही वृषभ राशीची खासियत. मात्र कधी कधी प्रेरणेचा अभाव, कमी ऊर्जा किंवा एखाद्या कामाला सुरुवात करण्यातील संथपणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. याच भावनेतून वृषभ राशीसाठी खास तयार करण्यात आले आहे सनस्टोन आणि कार्नेलियन क्रिस्टल्सपासून ब्रेसलेट. हे ब्रेसलेट सकारात्मकता, आत्मविश्वास आणि कृतीशीलतेची भावना जोपासण्यासाठी मदत करते. सनस्टोन हे सकारात्मक दृष्टिकोन आणि उत्साही मनःस्थिती जोपासण्यासाठी, स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि पुढे जाण्याची प्रेरणा देणारा सुंदर क्रिस्टल. तर कार्नेलियन हा ऊर्जा, आत्मविश्वास आणि कृती करण्याची प्रेरणा वाढवण्यासाठी पारंपरिकरित्या वापरला जाणारा क्रिस्टल.
हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.
ब्रेसलेटचे फायदे
आत्मविश्वास वाढवते
भावनांचे संतुलन राखते
आंतरिक ऊर्जेला चालना देते
सकारात्मक मनःस्थितीस मदत करते
सातत्य आणि एकाग्रता राखण्यास मदत करते
ब्रेसलेट कसे घालावे?
सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या
शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे
या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवा. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात
सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे ब्रेसलेट डाव्या हातात धारण करा
धारण करण्यापूर्वी शांतता, स्थिरता आणि भावनिक समतोल यांसारखा एखादा संकल्प करा
ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?
ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा
ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका
कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा
कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो
साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा
दैनंदिन आयुष्यात सकारात्मकता आणि प्रेरणेची भावना जपण्यासाठी वृषभ राशीसाठी खास क्रिस्टल ब्रेसलेट
(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

