top of page

कन्या रास - कार्नेलियन आणि मिल्की क्वार्ट्ज ब्रेसलेट

₹1,499.00 Regular Price
₹799.00Sale Price
Quantity

अर्थ

कन्या राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे या व्यक्ती स्वभावतः व्यावहारिक, शिस्तप्रिय आणि बारकाव्यांकडे लक्ष देणाऱ्या असतात. मात्र, कधी कधी अतिविचारामुळे निर्णय घेण्यात अडथळा येऊ शकतो आणि आत्मविश्वास डळमळू शकतो. याच भावनेतून कन्या राशीसाठी खास कार्नेलियन आणि मिल्की क्वार्ट्ज क्रिस्टल्सपासून हे ब्रेसलेट तयार करण्यात आले आहे, जे मनाची स्पष्टता, स्थिरता आणि आत्मविश्वासाला सकारात्मक आधार देते. कार्नेलियन हा ऊर्जा, प्रेरणा आणि आत्मविश्वासाची भावना वाढवण्यास मदत करणारा क्रिस्टल. नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा आणि कृतीशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी याचा वापर केला जातो. मिल्की क्वार्ट्ज हा शांतता आणि स्थिरतेची भावना वाढवण्यासाठी वापरला जाणारा क्रिस्टल. सततच्या विचारांपासून मनाला थोडा विराम देऊन स्पष्ट विचार करण्यास मदत करणारा मानला जातो.


हे क्रिस्टल्स १००% नैसर्गिक व अस्सल आहेत, याचे प्रमाण म्हणून त्यासोबत एक लॅब सर्टिफिकेटदेखील देण्यात आले आहे.


ब्रेसलेटचे फायदे

  • मानसिक ताण कमी करते

  • आत्मविश्वास निर्माण करते

  • एकाग्रता आणि स्पष्टता सुधारते

  • अतिविचार करणाऱ्या मनाला शांत करते

  • कामात सातत्य आणि समतोल राखण्यास मदत करते


ब्रेसलेट कसे घालावे?

  • सर्वात आधी ब्रेसलेटचे शुद्धीकरण करून घ्या

  • शुद्धीकरण करण्यासाठी, एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात चिमूटभर समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ मिसळावे

  • या पाण्यात ब्रेसलेट १० ते २० सेकंद ठेवा. यामुळे ब्रेसलेट शुद्ध होते आणि त्याचे संरक्षक गुणधर्म अधिक सक्रिय होतात

  • सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हे ब्रेसलेट डाव्या हातात धारण करा

  • धारण करण्यापूर्वी शांतता, स्थिरता आणि आत्मविश्वास यांसारखा एखादा संकल्प करा


ब्रेसलेटची काळजी कशी घ्यावी?

  • ब्रेसलेट स्वच्छ करण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा

  • ब्रेसलेटचा पाण्याशी अधिक संपर्क येऊ देऊ नका

  • कोवळ्या उन्हात किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून उर्जित करा

  • कडक उन्हात ठेवण्याचे टाळावे, कारण यामुळे स्फटिकांचा रंग उडू शकतो

  • साबण, परफ्युम यांसारख्या हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा


मानसिक स्पष्टता, आत्मविश्वास आणि सकारात्मक ठेवणारे कन्या राशीसाठी खास क्रिस्टल ब्रेसलेट.


(टीप: सदर उत्पादनांची छायाचित्रं ही केवळ प्रातिनिधिक आहेत. आमची सर्व उत्पादने नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात असल्यामुळे प्रत्येक उत्पादनाचा आकार, रंग, पोत, नमुना आणि फिनिशमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारे उत्पादन हे दर्शविलेल्या छायाचित्रापेक्षा किंचित वेगळे दिसू शकते.)

    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    Best sellers

    bottom of page