ऑफिसमध्ये काम तुमचं पण क्रेडिट दुसऱ्याला दिलं जातंय? तुमची कुंडली काय सांगते?
- PRANALI GHOLAP
- Apr 6
- 2 min read
ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूवर—मग ते आरोग्य असो, आर्थिक स्थिती असो किंवा करिअर, ग्रहांच्या स्थितीचा खोलवर परिणाम होत असतो. अनेकदा असे घडते की, आपण ऑफिसमध्ये रात्रंदिवस मेहनत करतो, पण त्याचे फळ मात्र आपल्याला मिळत नाही. कामाचे श्रेय (Credit) दुसरेच कुणीतरी लाटून नेतात किंवा सहकाऱ्यांकडून अपेक्षित सन्मान मिळत नाही. जर तुमच्या बाबतीतही असे घडत असेल, तर तुमच्या कुंडलीतील काही 'कमकुवत' ग्रहांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.
१. सूर्य: मान-सन्मान आणि यशाचा कारक
सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. जर तुमच्या कुंडलीत सूर्याची स्थिती नाजूक असेल, तर कामाच्या ठिकाणी अनेक समस्या उद्भवू शकतात. तुम्ही कितीही उत्तम काम केले तरी वरिष्ठांच्या नजरेत ते भरत नाही.
सूर्याला बलवान करण्याचे उपाय:दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा.शक्य असल्यास रविवारी मीठ आणि मांसाहाराचे सेवन टाळा.'ओम सूर्याय नमः' या मंत्राचा नियमित जप करा.गहू किंवा गुळासारख्या वस्तूंचे रविवारी दान करणे शुभ ठरते.
२. मंगळ: ऊर्जा आणि साहसाचे प्रतीक मंगळ ग्रह व्यक्तीला कार्य करण्याची शक्ती आणि उत्साह देतो. जर कुंडलीत मंगळ कमजोर असेल, तर कामात निरुत्साह जाणवतो आणि आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य कमी होते. याचा थेट परिणाम तुमच्या परफॉर्मन्सवर होतो.
मंगळ दोष दूर करण्याचे उपाय:दर मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करा.मंगळवारचा उपवास केल्याने मंगळ ग्रहाची पीडा कमी होते.लाल रंगाच्या वस्तूंचे (उदा. मसूर डाळ किंवा लाल कापड) गरजूंना दान करा.
३. राहू-केतू: श्रेय हिरावून घेणारे ग्रह जेव्हा एखादी व्यक्ती तुमची मेहनत स्वतःच्या नावावर खपवते, तेव्हा त्यामागे राहू-केतूची भूमिका महत्त्वाची असते. हे छाया ग्रह जर प्रतिकूल असतील, तर मेहनतीचे फळ मिळण्यात अडथळे येतात आणि विनाकारण राजकारण किंवा तणाव वाढतो.
राहू-केतू शांत करण्याचे उपाय:
गणेश पूजन: भगवान गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांची नियमित पूजा केल्याने राहू-केतूचे अशुभ परिणाम कमी होतात.
पशुपक्ष्यांची सेवा: पक्ष्यांना धान्य घालणे किंवा श्वानाला भाकरी देणे, हे उपाय राहू-केतूच्या शांतीसाठी प्रभावी मानले जातात. टीप: सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त आहे. म्हणून आजच आमच्या अनुभवी ज्योतिषांचा सल्ला घ्या आणि तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष, निवारणाचे उपाय आणि भविष्य जाणून घेण्यासाठी https://www.lokmatbhakti.com/kundli-user-details या संकेतस्थळाला नक्की भेट द्या.




Comments