top of page
Search

'हा' मूलांक असलेल्या मुली उजळून टाकतात जोडीदाराचे भाग्य!

अंकशास्त्रानुसार, आपल्या जन्मतारखेचा केवळ आपल्या स्वभावावरच नाही, तर आपल्या भविष्यावरही खोलवर परिणाम होत असतो. प्रत्येक व्यक्तीचा १ ते ९ दरम्यान एक 'मूलांक' असतो, जो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडतो. आज आपण अशा मुलींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा मूलांक '३' आहे आणि ज्या आपल्या जोडीदाराच्या प्रगतीसाठी अत्यंत भाग्यशाली मानल्या जातात.

 

मूलांक ३ म्हणजे काय?  ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक '३' येतो. (उदा. २१ तारीख = २+१ = ३). अंकशास्त्रात या क्रमांकाच्या मुलींना अत्यंत बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी आणि प्रभावशाली मानले जाते.

 

स्वामी ग्रह: मूलांक ३ वर ग्रहांचा गुरु मानल्या जाणाऱ्या 'बृहस्पती'चे शासन असते. गुरु हा ज्ञान, समृद्धी, अध्यात्म आणि यशाचा कारक आहे. यामुळेच या मुलींमध्ये ज्ञान मिळवण्याची तीव्र ओढ असते. त्यांच्याकडे उपजतच नेतृत्वगुण असतात.

 

करिअरमधील भरारी: स्वावलंबी स्वभाव आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी, ही या मुलींची ओळख आहे. त्या कोणावरही विसंबून न राहता स्वतःचे ध्येय गाठतात. लेखन, कला, बँकिंग, क्रीडा, शिक्षण आणि मनोरंजन या क्षेत्रांत त्या उत्तम नाव कमावतात. 

 

वैवाहिक जीवन:

या मुली नातेसंबंधांना प्राधान्य देतात, मात्र त्यांचा 'स्वाभिमानी' स्वभाव कधीकधी लहान-मोठ्या वैचारिक मतभेदांना कारणीभूत ठरू शकतो. तरीही, सासरच्या मंडळींसाठी त्या‘भाग्यलक्ष्मी’ठरतात. त्यांच्या आगमनाने जोडीदाराच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी आणि यशाचे मार्ग मोकळे होतात. 


तुम्हालाही तुमचा मूलांक किंवा जोडीदाराबाबत सविस्तर जाणून घ्यायचं आहे? तर आजच आमच्या अनुभवी ज्योतिषांकडून योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी https://www.lokmatbhakti.com/numerology-user-details ला भेट द्या.

 
 
 

Comments


bottom of page